‘आवाज’ : ‘खिडकी चित्रां’चा शिल्पकार, खपाचे विक्रम करणारा हा दिवाळी अंक यंदा ७० वर्षांचा झाला!
आवाज’च्या वाचनाने विनोदी साहित्याची गोडी लागली. त्यामुळे पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, जयवंत दळवी, शन्ना नवरे, रमेश मंत्री, व. पु. काळे शामराव ओक, द. पा. खांबेटे, इंद्रायणी सावकार, मुकुंद टाकसाळे, मधू मंगेश कर्णिक आदींची नव्याने ओळख झाली. बागवेंकडे मोठ्या फळ्यावर अंकांची नावं लिहिली जात. अंक संपला की, त्याच्यासमोर फुली पडे. कमीत कमी वेळात फुली पडण्याचा मान ‘आवाज’ने कित्येक वर्षं पटकावला.......